नागझरी रस्त्यावर रात्री ‘ओव्हरलोड’ खनिज वाहतूक

नागझरी रस्त्यावर रात्री ‘ओव्हरलोड’ खनिज वाहतूक
Published on

अतिअवजड वाहनांची रात्री अरेरावी
नागझरी रस्त्यावर वाहतूक नियमांना हरताळ

बोईसर, ता. २६ (वार्ताहर) : बोईसर-नागझरी रस्त्यावर रात्री क्षमतेपेक्षा जास्त भरलेल्या गौण खनिजाच्या वाहतुकीचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ही वाहने कोणतीही सुरक्षा यंत्रणेशिवाय बिनधास्तपणे रस्त्यावर धावत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शनिवारी रात्री ९.३० ते १०च्या सुमारास हा प्रकार दिसून आला. विशेष म्हणजे, एवढ्या उशिरा अशा प्रकारची वाहतूक होत असल्याने विनापरवाना असल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. तसेच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत प्रशासनाच्या नजरेआड गाड्या चालवल्या जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे अपघाताचा धोका असून सर्वसामान्यांच्या जीविताला धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com