

महाराष्ट्रदिनी जनगणनेचा श्रीगणेशा
मिरा-भाईंदरमध्ये स्वगणना करण्याची सुविधा
भाईंदर, ता. २६ (बातमीदार) : महाराष्ट्र दिनापासून जनगणना २०२७ या राष्ट्रीय उपक्रमाची सुरुवात होणार आहे. मिरा-भाईंदर क्षेत्रात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी पालिकेने जय्यत तयारी सुरू केली असून पहिल्या टप्प्याची सुरुवात स्वगणनेने होणार आहे.
देशात पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने जनगणना पार पडणार आहे. स्वगणनेद्वारे नागरिकांना स्वत: त्यात सहभागी होता येणार आहे. १ मे ते १५ मेदरम्यान स्वगणना पार पडणार आहे. त्यासाठी नागरिकांनी जनगणनेच्या http://se.crnsus.gov.in संकेतस्थळावर मोबाईल ॲप्लीकेशन डाऊनलोड करायचे आहे. त्यात २४ प्रश्न असणार आहेत. जनगणना ही विकास आराखडा, पायभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा व केंद्र सरकारच्या पंचवार्षिक योजना नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे जनगणनेच्या कामाकरिता अधिकृत कर्मचाऱ्यांना, प्रगणक, पर्यवेक्षक यांना आवश्यक माहिती देण्याचे आवाहन मिरा-भाईंदर महापालिकेकडून करण्यात आले आहे.
----------------------------------
प्रकिया दोन टप्प्यांत
पहिल्या टप्प्यात योग्य उत्तरे भरल्यानंतर मोबाईलवर ओटीपी येणार आहे. त्यानंतर जनगणना प्रगणक घरी येईल तेव्हा ओटीपी क्रमांक दिल्यानंतर भरलेली सर्व माहिती संबंधित प्रगणकाकडे गोपनीय माहिती हस्तांतरित होणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून या कालावधीत प्रत्यक्ष घरगणना करण्याचा टप्पा सुरू होणार आहे. या टप्प्यात प्रगणक अथवा पर्यवेक्षक प्रत्यक्ष भेट देऊन माहिती गोळा करणार आहेत.
-----------------------------------
अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
पालिका प्रशासनाकडून सर्व संबंधित कर्मचारी, प्रगणक व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले असून जनगणना कार्य अचूक पारदर्शक वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.