

परिश्रमाच्या जोरावर यशाला गवसणी
डॉ. अजय डोके यांची आएएस होण्याची स्वप्नपूर्ती
जव्हार, ता. २६ (बातमीदार) ः तालुक्यातील कोगदे आदिवासीबहुल गावात जन्मलेले डॉ. अजय डोके यांनी जिद्द, परिश्रमाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएसी परीक्षेत सलग तीन वेळा यश मिळवत आयएएस पद गाठले आहे.
१४ जुलै १९९७ रोजी जन्मलेल्या अजय यांचे बालपण अत्यंत साधेपणात गेले. वडील शेतकरी, तर आई गृहिणी असल्याने आर्थिक अडचणीतही त्यांनी शिक्षणाची ओढ, कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे अभ्यासात चमक दाखवली. जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असताना नेहमी प्रथम क्रमांक पटकावला. पुढे ब्रम्हा व्हॅली शाळेत शिक्षण घेत बारावीपर्यंत सातत्यपूर्ण यश मिळवले. त्यानंतर मुंबईतील केईएम वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. डॉक्टर होण्याचा प्रवास सुरू असतानाच त्यांनी यूपीएससीचे स्वप्न पाहिले.
-----------------------
गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी
अजय यांनी २०२०, २०२३, २०२४ तीनही वर्षांत पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होत २०२५ मध्ये आयएएस पद मिळवत ध्येयपूर्ती केली आहे. सध्या गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. डोके ग्रामीण, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.