ठाण्यात खड्ड्यात पडलेल्या श्वानाची सुटका

ठाण्यात खड्ड्यात पडलेल्या श्वानाची सुटका
Published on

ठाणे : नितीन कंपनी परिसरात बांधकाम प्रकल्पावरील ३० ते ५० फूट खोल खड्ड्यात पडलेल्या श्वानाची सुखरूप सुटका करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता. २५) रात्री उशिरा घडली. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला शनिवारी रात्री सुमारे ११.५० वाजता या घटनेची माहिती मिळाली. नितीन कंपनी गेटसमोरील पंचतत्त्व कन्स्ट्रक्शन साईटवरील एका खड्ड्यात श्वान पडल्याची माहिती स्थानिक रहिवासी रमेश मोरे यांनी दिली. माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवत खड्ड्यात अडकलेल्या श्वानाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com