

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : रबोडी परिसरात घरगुती वादातून संतापलेल्या व्यक्तीने पत्नी, मुलगी आणि नातीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तिघी जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शगुप्ता अन्सार हुसेन अन्सारी (वय ३९) या पती व मुलींसह रबोडी येथे वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी त्या मुलींसह माहेरी आल्या होत्या. त्यांच्या आई-वडिलांमध्ये घरगुती कारणांवरून वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. २५ एप्रिलला मध्यरात्रीच्या सुमारास घरात टीव्ही पाहण्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला. वडील मोहम्मद तारीख खान यांनी टीव्ही लावण्यास विरोध करत कुटुंबीयांना शिवीगाळ केली. यावेळी आईने विरोध केल्याने ते अधिक संतापले. रागाच्या भरात त्यांनी घरातील भाजी कापण्याचा चाकू उचलून पत्नीच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शगुप्ता यांनी आईला वाचवण्यासाठी पुढे येताच त्यांच्या डाव्या हाताच्या पंजावर व उजव्या कोपरावर वार करण्यात आला. त्यांची मुलगी तुबा हिच्याही हातावर वार करून जखमी केले. तिघींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मोहम्मद तारीख खान यांच्याविरुद्ध रबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.