

भिवंडी, ता. २६ (बातमीदार) : भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात प्रभाग समिती क्र. १ ते ५ अंतर्गत करवसुलीत लक्षणीय व समाधानकारक प्रगती झाली आहे. या पार्श्वभूमीवर १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महापालिका स्तरावर गौरव व सत्कार करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
प्रस्तावानुसार प्रभाग समिती क्र. १ ते ५ अंतर्गत प्रत्येकी एक, महापालिकेच्या विविध विभागांतील एक अशा कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हा उपक्रम कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान करणारा, तसेच इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. काही वर्षांच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात करवसुलीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०२५-२०२६ या वर्षात पहिल्यांदाच पालिकेने १०० कोटींपेक्षा अधिक करवसुलीचा टप्पा गाठला आहे. प्रशासकीय कार्यक्षमता, नियोजनबद्ध अंमलबजावणी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाल्याचे मानले जात आहे.
निलंबित कर्मचाऱ्यांच्या पुनर्स्थापनेचीही मागणी
करवसुलीत उद्दिष्टपूर्ती न झाल्यामुळे यापूर्वी काही कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात केले होते. या निलंबित कर्मचाऱ्यांना १ मे रोजी पुन्हा सेवेत पुनर्स्थापित करण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी महापौर नारायण चौधरी यांनी आयुक्त अनमोल सागर यांच्याकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.