

श्रीवर्धनमध्ये अत्याधुनिक डायलिसिस मशीनचे लोकार्पण
किडनी रुग्णांना स्थानिक पातळीवर सुविधा
श्रीवर्धन, ता. २४ (वार्ताहर): श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस मशीनचे लोकार्पण खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते पार पडले. या सुविधेमुळे तालुक्यातील किडनी रुग्णांना आता शहरात जावे लागणार नसून स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचार उपलब्ध होणार आहेत.
सीएसआर निधीतून उपलब्ध करण्यात आलेले हे मशीन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून रुग्णांना सुरक्षित, जलद आणि परिणामकारक उपचार देण्यास सक्षम आहे. त्यामुळे अधिक रुग्णांना वेळेत डायलिसिस सेवा मिळणार असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. कौस्तुभ केळस्कर, नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले, उपनगराध्यक्ष अनंत गुरव तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
नागरिकांना दिलासा
या मशीनमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार असून, किडनी रुग्णांचा वेळ, खर्च आणि प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. स्थानिक पातळीवर उपचार उपलब्ध होणे ही आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वाची प्रगती मानली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.