कामगार दिनी मेळाव्याचे आयोजन

कामगार दिनी मेळाव्याचे आयोजन
Published on

कामगारदिनी मेळाव्याचे आयोजन

शिवडी (बातमीदार) : जे कामगार कायदे १०० वर्षांपेक्षा अधिक काळ लढून ‌मिळविले, ते मोडीत काढून कामगार हिताला आणि कामगार चळवळीला बाधक ठरणाऱ्या चार कामगार संहिता लागू करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या या कामगार धोरणाविरुद्ध गेल्या १० वर्षांपेक्षा अधिककाळापासून इंटक, एचएमएस, आयटक, सिटू, एआयसीसीटीयू, भारतीय कामगार सेना, टीयूसीआय आणि बँक, विमा शिक्षक या संघटना गेल्या १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून लढत आहेत. या कामगार संघटना, संयुक्त कृती समिती या बॅनरखाली येत्या शुक्रवारी (ता.१) परेल रेल्वे स्टेशन ते गं. द. आंबेकर मार्गावरील राष्ट्रीय मिल मजदूर संघापर्यंत कामगारांची भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर ५ वाजता तेथील महात्मा गांधी सभागृहात कामगारांचा महामेळावा पार पडेल. त्या वेळी कामगारांच्या हक्कासाठी तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शहीद झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येईल. कामगार नेते, माजी राज्यमंत्री आमदार सचिन अहिर यांनी जागतिक कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि त्या अनुषंगाने साजरा करण्यात येणाऱ्या प्रेरणा दिनाला पाठिंबा दिला आहे. मेळाव्यात अनेक कामगार नेत्यांची भाषणे होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com