उपायुक्तांच्या प्रस्तावाला स्थगिती

उपायुक्तांच्या प्रस्तावाला स्थगिती
Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २६ : राज्य सरकारकडून नवी मुंबई महापालिकेच्या सेवेत कायम समायोजन झालेले प्रतिनियुक्तीवरील अधिकारी डॉ. राहुल गेठे यांना पुन्हा सरकारच्या सेवेत परत पाठवण्याचा ठराव स्थगित करण्यात आला. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गेठे यांना परत सरकारच्या सेवेत पाठवण्याचा ठराव सादर करण्यात आला होता. या ठरावाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर महापौर सुजाता पाटील यांनी विधी विभागाचा अभिप्राय घेण्यासाठी वर्ग केला.

नगरसेवक सूरज पाटील यांनी राहुल गेठे यांना परत राज्य सरकारच्या सेवेत पाठवण्याचा अशासकीय ठराव सादर केला. राहुल गेठे यांची नवी मुंबई महापालिकेतील २०२३ला कायम आस्थापनेत समायोजन केल्याची प्रक्रिया चुकीची असल्याचा दावा पाटील यांनी केला. गेठे हे महापालिकेतील सद्यस्थितीत असणाऱ्या उपायुक्तांच्या एकूण पदांपैकी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच ते राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टर या तांत्रिक पदावर असल्याने त्यांना महापालिकेच्या उपायुक्त या पदावर कायम समायोजन करता येत नाही, असा दावा केला. पाटील यांनी सादर केलेल्या ठरावावर शिवसेनेतर्फे नगरसेवक शिवराम पाटील आणि द्वारकानाथ भोईर यांनी मत व्यक्त केले.

आपले काम केले नाही म्हणून एका अधिकाऱ्याला वैयक्तिक कारणासाठी काढून टाका, हे म्हणजे सत्ताधाऱ्यांचे संख्याबळाच्या जोरावर दंडेलशाही सुरू आहे का, असा प्रश्न शिवराम पाटील यांनी उपस्थित केला. आपण राज्य सरकारसोबत पंगा का घेत आहोत, असाही प्रश्न पाटील यांनी विचारला. तर, आपण गेठे यांना पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अंतिम निर्णय हा राज्य सरकार घेणार आहे. गेठे यांची नियुक्ती नियमानुसार असेल तर सरकार पुन्हा हा ठराव फेटाळणार आहे, त्यामुळे ठराव मंजूर करण्याआधी याचा विचार करावा, असे भोईर यांनी सांगितले.

नगरसेविकांमध्ये तू तू मैं मैं!
या ठरावावर शिवराम पाटील यांनी, गेठे यांच्या कार्यालयात सत्ताधारी पक्षातील नगरसेवक दिसतात, असे वक्तव्य केले. गेठे हे किती सक्षम अधिकारी आहेत, हे सांगत असताना नगरसेविका अपर्णा गवते यांनी मध्येच वक्तव्य केले. त्यावर बोलताना शिवसेनेच्या नगरसेविका गौरी आंग्रे आणि अपर्णा गवते यांच्यात तू तू मैं मैं झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com