‘जागतिक हिवताप दिना’बाबत जनजागृती

‘जागतिक हिवताप दिना’बाबत जनजागृती
Published on

‘जागतिक हिवताप दिना’बाबत जनजागृती

वाडा, ता. २६ (बातमीदार): ‘जागतिक हिवताप दिना’निमित्त वाडा तालुक्यात आरोग्य विभागातर्फे विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात आले. ‘हिवताप निर्मूलनासाठी कटिबद्ध : आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे,’ या घोषवाक्याखाली नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी राव आणि तालुका आरोग्य अधिकारी शरयू तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली खानिवली, गोऱ्हे, परळी आणि कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत गावांमध्ये रॅली, प्रबोधन सत्रे आणि घरभेटी आयोजित करण्यात आल्या. खानिवली परिसरात काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीत नागरिकांना मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया आणि फायलेरिया यांविषयी माहिती देण्यात आली. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी स्वच्छता राखणे, साचलेले पाणी टाळणे, मच्छरदाणीचा वापर करणे आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे यावर विशेष भर देण्यात आला.
तसेच हिवताप निर्मूलनासाठी नागरिकांकडून प्रतिज्ञाही घेण्यात आली. या उपक्रमांत तालुका हिवताप पर्यवेक्षक एस. एस. पाटील, विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. या मोहिमेमुळे हिवताप व इतर डासजन्य आजारांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
---------------------
संशयित रुग्णांची तपासणी

गोऱ्हे गावात विद्यार्थ्यांच्या सहभागातून रॅली काढण्यात आली. ‘डास हाकलू, आरोग्य राखू’ आणि ‘स्वच्छ गाव - निरोगी गाव’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. परळी येथेही नागरिकांना साथीच्या आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले, तर कुडूस परिसरात आरोग्य पथकांनी घरभेटी देऊन डास प्रतिबंधक उपायांची माहिती दिली आणि संशयित रुग्णांची तपासणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com