

रोह्यात राष्ट्रीय कृषी पंचायत दिन साजरा
शेतकऱ्यांना आधुनिक व सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन
रोहा, ता. २६ (बातमीदार) : चणेरा विभागातील कोकबन येथील मातोश्री रिसॉर्टमध्ये कृषी विद्यापीठ किल्ला व बीजामृत फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषी पंचायत दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान व सेंद्रिय शेतीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ. मनोज तलाठी, डॉ. मांजरेकर, डॉ. आरेकर, डॉ. कार्ले यांच्यासह सरपंच तेजस्विनी वाजंत्री, उपसरपंच शैलेश कोल्हटकर, सदस्य रमेश म्हात्रे, अशोक ठाकूर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बीजामृत कंपनीचे चेअरमन भारत पाटील आणि प्रगतीशील शेतकरी गणेश गावडे यांचाही सहभाग होता.
डॉ. आरेकर यांनी राष्ट्रीय कृषी पंचायत दिनाचे महत्त्व स्पष्ट केले, तर डॉ. कार्ले यांनी रासायनिक व सेंद्रिय खतांतील फरक सांगत दुष्परिणामांवर प्रकाश टाकला. भारत पाटील यांनी युरियाच्या अतिवापरामुळे होणारे नुकसान अधोरेखित करीत सेंद्रिय उत्पादनांचा वापर वाढवण्याचे आवाहन केले.
या वेळी माती परीक्षण केंद्र सुरू करण्यात आले. तसेच डॉ. मनोज तलाठी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. कृषी योजनांची माहिती क्यूआर कोडद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन भारत खाडे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.