

सिग्नलवरील यू-टर्न चालकाला महागात
धक्का लागल्याने चालकांमध्ये हाणामारी
नालासोपारा, ता. २६ (बातमीदार) : सिग्नलवर वाहनाची दिशा समजली नसल्याने बाजूने जाणाऱ्या दुचाकीला कारचा किरकोळ धक्का लागला. यावरून झालेल्या बाचाबाचीतून एकमेकांंवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये घडला आहे.
विरार पूर्वेतील चंदनसार रोडवर शनिवार (ता. २५) रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. या प्रकरणात कार, ॲक्टिव्हाचालक गंभीर जखमी झाल्याने दोघांच्या तक्रारींवरून एकमेकांविरोधात विविध कलमांन्वये विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व प्रकारचा लाइव्ह व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून, किरकोळ कारणावरून कारची काच फोडली आहे. या प्रकरणात विरार पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.