बेवारस गांजाप्रकरणी बिहारमध्ये धागेदोरे

बेवारस गांजाप्रकरणी बिहारमध्ये धागेदोरे
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : रेल्वे स्थानकावर गांजा या अमली पदार्थाची बॅग बेवारस स्थितीत टाकून पळ काढणाऱ्या व्यक्तीला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी बिहारमधून अटक केली. तसेच त्याला सोमवार (ता. २७)पर्यंत पोलिस कोठडी मिळाली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात गांजाने भरलेली सॅकबॅग बेवारस अवस्थेत १३ एप्रिलला आढळून आली होती. त्या वेळी बॅगेत एकूण एक लाख ६४ हजार ८०० रुपयांचा आठ किलो २४० ग्रॅम गांजा मिळून आला होता. ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत संशयिताचा माग काढला. संशयित बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील बन्धुबिगहा परिसरात असल्याची माहिती मिळाली. यानंतर ठाणे लोहमार्ग पोलिसांचे पथक १८ एप्रिलला बिहारमधील दाऊदनगर येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने २१ एप्रिलला विजय डोमन पासवान (वय ४१) याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याने आपल्या साथीदारासह गांजाची बॅग घेऊन रेल्वेने ठाणे स्थानकापर्यंत प्रवास केल्याची कबुली दिली.

पोलिसांमुळेच पळ काढला
पोलिसांच्या हालचालींची चाहूल लागताच त्यांनी फलाटावर सॅकबॅग बेवारस टाकून तेथून पळ काढल्याचेही उघड झाले. त्याला २१ एप्रिलला अटक करण्यात आल्यावर बुधवारी (ता. २२) दाऊदनगर येथील न्यायालयात हजर करून शनिवार (ता. २५)पर्यंत ट्रान्झिट रिमांड घेण्यात आली. त्यानंतर त्याला ठाण्यात आणून न्यायालयात हजर केले असता त्याला पुढील सुनावणीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com