

जोखमीच्या प्रसूतीनंतर माता सुखरूप
पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाला यश
पालघर, ता. २६ ः येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय पथकाच्या सांघिक प्रयत्नातून जोखमीच्या मातेची सुखरूप प्रसूती झाली आहे. समयसूचकतेबरोबर तातडीची शस्त्रक्रियेमुळे मातेसह बालकाचे प्राण वाचले आहेत.
पालघर तालुक्यातील गिरनोळी खुताडपाडा येथील येथील ३० वर्षीय महिला प्रसूतीसाठी मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. दुपारी दीड-दोनच्या सुमारास तिला प्रसूती वेदना सुरू झाल्याने केंद्रातील डॉ. स्वप्नाली वलटे यांनी महिलेला देखरेखेखाली ठेवले. दरम्यान, पालघर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. उमेश दुम्पलवार क्षेत्रभेटीनिमित्त नंडोरे येथे गेले होते. दुपारी महिलेच्या प्रसूतीदरम्यान बाळाचा हात बाहेर आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रसूती जोखमीची झाल्याने डॉ. वलटे यांनी डॉ. दुम्पलवार यांच्याशी संपर्क साधला. या महिलेला पालघर ग्रामीण रुग्णालयात तातडीने हलवण्याची सूचना केली. डॉ. दुम्पलवार यांनी पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाला शस्त्रक्रियेविषयी आवश्यक माहिती देऊन पथक सज्ज ठेवले होते. त्यानुसार सर्व तयारी करून ठेवण्यात आली.
-------------------------
बाळाची प्रकृती स्थिर
मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रातून गर्भवती महिलेला १५ मिनिटांमध्ये रुग्णवाहिकेतून पालघर ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया सुरू केल्यानंतर १० मिनिटांत बाळ जन्माला आले. नवजात बाळाला श्वास घेणे कठीण होत असल्याने पालघरच्या एका रुग्णालयाच्या विशेष कक्षामध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले.
---------------------
खासदारांकडून अभिनंदन
पालघर ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप यादव, भूलतज्ज्ञ डॉ. राजेश सिंह, समन्वयकाची भूमिका बजावणारे डॉ. उमेश दुम्पलवार, पालघर ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका, कर्मचारीवर्ग या सर्वांच्या समयसूचकतेसह सांघिक भावनेने केलेले कार्य गौरवास्पद असल्याचे अभिनंदन पत्र जिल्ह्याचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सर्वांना दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.