

मुदतबाह्य औषधांशी संबंध नाही
उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांचा दावा
भाईंदर, ता. २६ (बातमीदार) : भाईंदर पश्चिम येथील भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात सापडलेल्या सुमारे दीड कोटी मुदतबाह्य औषधांशी आपला कोणताही संबंध नाही, असा दावा उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी केला आहे.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी (ता. २४) जोशी रुग्णालयाला भेट दिली. त्या वेळी त्याठिकाणी मुदत संपलेल्या दीड कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या औषधांचा साठा आढळला होता. सक्षम फाउंडेशन या संस्थेने आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता व उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या उपस्थितीत ही औषधे रुग्णालयाला मोफत दिली होती. मात्र, औषधे दिल्यानंतर आवघ्या दोन दिवासांत त्यांची मुदत संपुष्टात आली होती. औषधे दिलेल्या सक्षम फाउंडेशन या संस्थेशी ध्रुवकिशोर पाटील यांचा संबंध असल्याचा गंभीर आरोप सरनाईक यांनी त्या वेळी केला होता. मात्र, हा आरोप पाटील यांनी फेटाळून लावला आहे. या संस्थेशी आपला काडीमात्र संबंध नाही. संस्थेने आमंत्रित केल्यामुळे औषध वाटपाच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलो होतो.
रुग्णालयाला औषधे देण्याबाबत आपण संस्थेला सांगितले नाही अथवा संस्थेकडून औषधे घेण्याबाबत रुग्णालयाला आपण सांगितलेले नाही. त्यामुळे सरनाईक यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे व निराधार आहेत. कोणाच्या तरी सांगण्यावरून हे आरोप करण्यात आले असून, सरनाईक यांच्यासारख्या जबाबादार मंत्र्यांनी सत्य पडताळणी केल्याशिवाय, असे आरोप करणे चुकीचे आहे. मुदतबाह्य औषधांचा प्रकार गंभीर असून, रुग्णालय प्रशासनाने त्यांची सखोल चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आपलीदेखील मागणी असल्याचे ध्रुवकिशोर पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.