भरत कासले यांना पदोन्नती

भरत कासले यांना पदोन्नती
Published on

भरत कासले यांना पदोन्नती

विक्रमगड (बातमीदार) : विक्रमगड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी भरत कासले यांची पदोन्नती झाली असून त्यांची अधीक्षक पदावर (वेतन व भविष्य निर्वाह निधी) सोलापूर येथे नियुक्ती झाली आहे. यानिमित्ताने नुकताच पंचायत समिती विक्रमगड येथे त्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. अत्यल्प कालावधीत विक्रमगड तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वोत्तम कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचे या वेळी आभार मानण्यात आले. तसेच समन्वय समितीमार्फत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमप्रसंगी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रभू पाचमासे, केंद्रप्रमुख निवास ठाकरे, शिक्षक पतपेढी संचालक प्रशांत नडगे, शिक्षक भारती संघटना अध्यक्ष दुर्वास पवार, पेसा संवर्ग जिल्हा अध्यक्ष सुभाष राथड, बाबू मोरे, दीपक जाधव, नितीन लांडे, विजय चौधरी, किरणकुमार नायडू, संगमेश्वर एकाळे, संदेश वळवी, सचिन भुसारे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली व शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com