उधवा ग्रंथालयाला पुस्तक भेट

उधवा ग्रंथालयाला पुस्तक भेट
Published on

उधवा ग्रंथालयाला पुस्तक भेट

कासा (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा उधवा येथील ग्रंथालयाला मुंबई उच्च न्यायालयातील सहाय्यक सरकारी वकील (एजीपी) ॲड. पूजा जोशी-देशपांडे यांनी आपल्या वाढदिवसाचे तसेच जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ६,१५९ रुपयांच्या २१ पुस्तकांची भेट दिली. ॲड. जोशी यांना वकिली क्षेत्रातील १७ वर्षांचा अनुभव असून त्या मागील तीन वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्या मुंबई ग्राहक पंचायत या प्रतिष्ठित संस्थेसोबत स्वयंसेवक म्हणून कार्य करत ग्राहक जनजागृती व हक्क संरक्षणासाठीही योगदान देत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणूअंतर्गत आश्रमशाळांची पाहणी केली असता उधवा येथील ग्रंथालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले होते. याच उपक्रमाने प्रेरित होऊन ॲड. पूजा जोशी-देशपांडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी ज्ञानवर्धक व दर्जेदार पुस्तके भेट म्हणून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com