मुलुंडला धूळप्रदूषणाचा विळखा

मुलुंडला धूळप्रदूषणाचा विळखा
Published on

मुलुंडला धूळ प्रदूषणाचा विळखा
मुलुंड, ता. २६ : मुलुंड पूर्व-पश्चिम परिसरात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्ते कामांमुळे धूळ प्रदूषण तीव्र झाले असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. कामांदरम्यान पाणी शिंपडणे, फॉगिंगसारख्या उपायांकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरात सतत धुळीचे ढग निर्माण होत आहेत. याचा फटका लहान मुले, ज्येष्ठ आणि श्वसनविकारग्रस्तांना बसत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर काँग्रेस नेते राकेश शेट्टी यांनी पालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देत तातडीने कारवाई, नियमांची अंमलबजावणी आणि दोषींवर दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com