आगरी महोत्सवात राजकीय अडथळे

आगरी महोत्सवात राजकीय अडथळे
Published on

आगरी महोत्सवात राजकीय अडथळे
जुहूगाव ग्रामस्थांचा संताप; लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप
तुर्भे, ता. २६ (बातमीदार) : वाशीतील जुहूगाव येथील गावदेवी मैदानात आयोजित आगरी कोळी महोत्सवाला स्थानिक लोकप्रतिनिधींकडून अडथळे निर्माण झाल्याचा आरोप समोर आला असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महोत्सवाच्या कालावधीवर निर्बंध, परवानगीतील विलंब आणि अचानक कार्यक्रम बंद पाडण्याच्या प्रकारामुळे सांस्कृतिक कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप झाल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे.
नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजाच्या सांस्कृतिक जतनासाठी आयोजित या महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. ठाणे, मुंबई आणि रायगडमधील विविध समाजघटकांनी सहभाग घेत एकात्मतेचे दर्शन घडवले. मात्र आयोजकांनी १७ दिवसांची मागणी केली असताना प्रशासनाने केवळ १२ दिवसांची परवानगी दिली. यामुळे नियोजनावर परिणाम होऊन आयोजकांना आर्थिक फटका बसला.
याशिवाय काही लोकप्रतिनिधींनी महोत्सवाच्या विरोधात आयुक्तांवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाढीव परवानगीसाठी दिलेले अर्ज स्वीकारले गेले नाहीत तसेच टपालाद्वारे पाठवलेल्या अर्जांनाही उत्तर मिळाले नाही. दरम्यान, २४ एप्रिलला ऐन रंगात सुरू असलेला कार्यक्रम प्रशासनाने अचानक बंद पाडल्याने उपस्थित नागरिकांचा हिरमोड झाला.
चौकट
परवानगीला विलंब
महोत्सवासाठी मागितलेल्या १७ दिवसांच्या परवानगीऐवजी १२ दिवसांचीच मंजुरी मिळाली. अर्ज नाकारले जाणे आणि परवानगीत विलंब यामुळे आयोजकांना आर्थिक व नियोजनाचा फटका बसला.

संताप वाढला
२४ एप्रिलला सुरू असलेला महोत्सव अचानक बंद पाडल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली. यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी निषेध नोंदवला. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत संबंधित लोकप्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. आयोजकांनीही पुराव्यानिशी नावे जाहीर करण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com