ऐरोली माध्यमिक विद्यालयाची भरारी

ऐरोली माध्यमिक विद्यालयाची भरारी
Published on

ऐरोली माध्यमिक विद्यालयाची भरारी
एनएमएमएस परीक्षेत २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक; गुणवत्तेची पुन्हा सिद्धी
नवी मुंबई, ता. २६ : ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचालित ऐरोली माध्यमिक विद्यालयाने डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या एनएमएमएस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी मेधा शिष्यवृत्ती योजना) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करीत २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. बुद्धिमत्ता आणि शैक्षणिक गुणवत्ता यांची कसोटी मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत विद्यालयाने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, कठोर मेहनत आणि शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. संस्थेचे अध्यक्ष सुरेश (भाऊ) संकपाळ, सचिव तुकाराम नांदुगडे, मुख्याध्यापक देसाई तसेच पर्यवेक्षक साळुंखे, जाधव आणि स्कॉलरशिप टीमच्या शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.
या देदीप्यमान यशात पालकांचेही मोलाचे सहकार्य लाभले. शिष्यवृत्तीअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी १२ हजार रुपये याप्रमाणे पुढील चार वर्षे आर्थिक मदत मिळणार असून, सर्व विद्यार्थ्यांना मिळून सुमारे १२ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहे.
गेल्या ४५ वर्षांपासून ऐरोली माध्यमिक विद्यालय गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात अग्रेसर असून, एसएससी परीक्षेत सातत्याने १०० टक्के निकाल आणि गुणवत्ता यादीत स्थान मिळवत आहे. एनएमएमएस परीक्षेतील यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com