नवी मुंबईत २५ हिवताप जनजागृती शिबिरे

नवी मुंबईत २५ हिवताप जनजागृती शिबिरे
Published on

नवी मुंबईत २५ हिवताप जनजागृती शिबिरे
१०,८७३ नागरिकांपर्यंत पोहोच
वाशी, ता. २६ (बातमीदार) : जागतिक हिवतापदिनानिमित्त नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाने शहरात व्यापक जनजागृती मोहीम राबवत २५ शिबिरांच्या माध्यमातून तब्बल १०,८७३ नागरिकांपर्यंत पोहोच साधली. ‘हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध : आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे’ या घोषवाक्याखाली विविध उपक्रम राबवण्यात आले.
महापालिकेच्या २४ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत आयोजित शिबिरांमध्ये हिवताप, डेंगी तसेच इतर साथीच्या आजारांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने, अळ्यांची ओळख आणि घराभोवती डासांची वाढ होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत नागरिकांना प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. तसेच उष्णतेच्या लाटेपासून बचाव आणि आगामी पावसाळ्यात साथीचे आजार टाळण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेवरही भर देण्यात आला. महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरातील पाण्याचे साठे झाकून ठेवण्याचे, परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि डासांची उत्पत्ती रोखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष पथनाट्ये
जॉगर्स पार्क व सार्वजनिक ठिकाणी विशेष शिबिरे घेऊन १,९०५ नागरिकांपर्यंत पोहोच साधली. तसेच ३१ ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी ज्वेल ऑफ नवी मुंबई, राजीव गांधी जॉगर्स पार्क (वाशी) आणि कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यान येथे विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली. या ठिकाणी १,९०५ नागरिकांना थेट मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, नेरूळ, वाशी आणि ऐरोली येथील रुग्णालयांमध्ये पथनाट्यांच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात येत असून, ही सादरीकरणे ५ मेपर्यंत ३१ ठिकाणी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com