

कळंबोलीतील कचरा व ड्रेनेज समस्येवर तत्काळ कार्यवाही
नगरसेवक रामदास शेवाळे यांचे रहिवाशांकडून आभार
पनवेल, ता. २६ (बातमीदार) : पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक आठमधील कळंबोली येथील केएल-२ सेक्टर पाच परिसरात कचरा साचणे आणि ड्रेनेज लाइन बंद होण्याच्या समस्येमुळे रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत नागरिकांनी नगरसेवक रामदास शेवाळे यांच्याकडे तक्रार नोंदवल्यानंतर तत्काळ कार्यवाही करण्यात आली.
नागरिकांच्या अडचणीची दखल घेत नगरसेवक शेवाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यांच्या पुढाकारामुळे पनवेल महापालिकेने विलंब न करता परिसरात स्वच्छता मोहीम राबवली, तसेच बंद पडलेल्या ड्रेनेज लाइन दुरुस्तीचे काम हाती घेतले.
सध्या केएल-२ सेक्टर पाच परिसरात साफसफाई आणि ड्रेनेज दुरुस्तीची कामे वेगाने सुरू असून त्यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. परिसरातील दुर्गंधी आणि अस्वच्छतेतही घट झाली आहे. नगरसेवकांच्या तत्परतेबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करीत त्यांचे आभार मानले आहेत. तसेच भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत, यासाठी प्रशासनाने नियमित देखरेख ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.