खारघरमध्ये अनधिकृत शेडवर तोडक कारवाई

खारघरमध्ये अनधिकृत शेडवर तोडक कारवाई
Published on

खारघरमध्ये अनधिकृत शेडवर तोडक कारवाई
हॉटेल, नर्सरीवर महापालिकेचा हातोडा
खारघर, ता. २६ (बातमीदार) : महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’मार्फत खारघर परिसरात अनधिकृत बांधकामांविरोधात तोडक कारवाई करीत विविध हॉटेलबाहेरील शेड हटविण्यात आली. वारंवार नोटीस देऊनही निर्देशांचे पालन न झाल्याने अखेर जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान जेजे रसोई बार, अचिजा हॉटेल, एल ताकोस, ब्लू टोकाई कॉफी रोस्टर्स, पानाश कॅफे, बाईकर्स ब्रेव्हिस कॅफे आणि कोटीयार्ड कॅफे या आस्थापनांच्या बाहेरील अनधिकृत शेड हटविण्यात आली. संबंधितांना यापूर्वी अनेक वेळा सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने महापालिकेने कठोर पावले उचलली.
महापालिका उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमणाविरोधात ही मोहीम राबविण्यात आली. प्रभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, प्रभारी अधीक्षक जितेंद्र मढवी यांच्यासह अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी या कारवाईवेळी उपस्थित होते.
दरम्यान, खारघर रेल्वे स्थानकाजवळ तसेच सेक्टर २०-२१ परिसरातील एका अनधिकृत नर्सरीवरही कारवाई करण्यात आली. नर्सरीतील साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com