कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी अनधिकृत स्टॉल सुरू

कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी अनधिकृत स्टॉल सुरू
Published on

ठाणे शहर, ता. २६ (बातमीदार) : उन्हाळी हंगामामुळे एसटीवर प्रवासी वाहतुकीचा भार वाढला आहे. परिणामी स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढू लागली असून, परिसरातील अनधिकृत खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा अडथळा ठरत आहे. हा अडथळा दूर होऊन स्थानकाची कोंडीतून मुक्तता व्हावी, या हेतूने राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नीने वंदना एसटी स्टॅन्ड परिसरातील अनधिकृत स्टॉलबाबत केलेल्या तक्रारीची दखल ठाणे महापालिकेने घेतली होती. मात्र, एका दिवसाची कारवाई करताच पुन्हा दुसऱ्याच दिवशी येथे पुन्हा अनधिकृत स्टॉल उभे राहिल्याने पालिकेने केलेली कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

वंदना एसटी स्थानकामधून लांब पल्ल्याची प्रवासी वाहतूक होते. येथून रोज हजारो प्रवासी राज्याबाहेर आणि राज्यातील कानाकोपऱ्यात प्रवास करतात. त्यामुळे हे स्थानक दिवस-रात्र प्रवाशांनी गजबजलेले पाहायला मिळते. सध्या सुरू असलेल्या उन्हाळी हंगामामुळे येथे प्रवाशांची गर्दी वाढत चालली असून, एसटी महामंडळाकडूनदेखील प्रवाशांकरिता जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, सध्या अनधिकृत स्टॉलधारकांच्या अतिक्रमणाने हे स्थानक व्यापले आहे.

ही बाब विचारात घेऊन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक यांनी स्टॉलवर कारवाई करण्याकरिता ठाणे महापालिकेकडे तक्रार केली आहे. त्यावर अतिक्रमण हटाव विभागाने त्यावर कारवाई करून ते निष्कासित केले होते. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्टॉलधारकांनी पुन्हा स्टॉल उभे करून येथे अडथळे निर्माण केले आहेत.

चालकांची कसरत
स्थानकाच्या प्रवेशद्वारावर अनधिकृत चहा, विडी, सिगारेट आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल उभे करण्यात आले आहेत. या स्टॉलमुळे एसटी आतबाहेर करताना चालकाला प्रचंड खबरदारी घ्यावी लागते. प्रवेशद्वाराला लागूनच स्टॉल असल्यामुळे तिथे उभ्या राहिलेल्या ग्राहकांना अपघात होण्याची भीती वाटत आहे. चालकालादेखील गाडी बाहेर काढणे किंवा आत नेण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com