ठाणे रेल्वे परिसरात प्रतिबंधित अन्नपदार्थांवर कारवाई

ठाणे रेल्वे परिसरात प्रतिबंधित अन्नपदार्थांवर कारवाई
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : रेल्वे स्थानक परिसरामधील सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीविरोधात ठाणे अन्न सुरक्षा विभागाने कारवाई केली. या कारवाईत सात पान शॉपधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण २६ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा आडे यांच्या माहितीनुसार, तपासणीदरम्यान विविध पान शॉपमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला. विविध ब्रँडची पॅकेट जप्त करण्यात आली. साठा कोठून आणला, उत्पादक कोण आहे किंवा खरेदी बिल याबाबत विचारणा करूनही विक्रेत्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे अन्न सुरक्षा आयुक्तांच्या १६ जुलै २०२५च्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार हा साठा पुन्हा बाजारात विक्रीस येऊ नये, म्हणून तो ताब्यात घेण्यात आला. तसेच स्टार पान शॉप, राजपुरी पान शॉप, आर. के. पान शॉप, किंग पान शॉप, कोहिनूर पान शॉप इत्यादी दुकानांचे विक्रेते, पुरवठादार व उत्पादकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com