कोपरीत मध्यरात्री बत्तीगुल

कोपरीत मध्यरात्री बत्तीगुल
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : दोन दिवसांपूर्वी पाचपाखाडी भागात तब्बल ११ तास वीज खंडित झाल्यानंतर आता कोपरी गावातही मध्यरात्री अचानक बत्तीगुल झाल्याचा प्रकार घडला. ऐन उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी वीज खंडित झाल्याने कोपरीकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

ठाणे शहरात शनिवारी (ता. २५) तापमान सुमारे ४२ अंशांपर्यंत पोहोचले होते. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना रविवारी (ता. २६) रात्री विश्रांती मिळेल, अशी अपेक्षा असतानाच सुमारे १२.३० वाजता कोपरी गावात अचानक वीज पुरवठा खंडित झाला. झोपेच्या वेळीच वीज गेल्याने नागरिकांचा जीव कासावीस झाला. स्थानिकांनी तत्काळ महावितरण विभागाला याची माहिती दिल्यानंतर सुमारे तासाभराने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, अवघ्या अर्ध्या तासात पुन्हा वीज खंडित झाली. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

तक्रारीनंतर महावितरण कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीत ट्रान्सफॉर्मरमध्ये गंभीर बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मध्यरात्री सुमारे अडीच वाजता नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम पूर्ण करण्यासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागला. अखेर पहाटे सहा वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. दरम्यान, या कालावधीत उकाड्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे महावितरणच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com