व्यावसायिकाच्या ‘शेतकरी’ दाखल्याची चौकशीची मागणी

व्यावसायिकाच्या ‘शेतकरी’ दाखल्याची चौकशीची मागणी
Published on

शहापूर, ता. २६ (वार्ताहर) : मुरबाड तालुक्यातील आंबिवली; तसेच उरण तालुक्यातील विंधणे येथे जमीन खरेदी करताना स्वतःला शेतकरी म्हणून दाखवलेल्या व्यावसायिक टेकचंद थेराणी यांच्या दाखल्याची सखोल चौकशी करण्याची मागणी आंबिवलीतील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या मते, आंबिवली गावातील सर्व्हे क्रमांक ४७/३ या जमिनीच्या व्यवहारात सर्च टायटलची योग्य तपासणी करण्यात आली नाही. तसेच या जमिनीच्या परंपरागत वारसांना वगळण्यात आल्याची तक्रारही करण्यात आली आहे. या व्यवहारासाठी थेराणी यांनी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील विंधणे गावातील शेतकरी असल्याचे कागदपत्रांद्वारे दर्शविले आहे. मात्र, विंधणे येथे जमीन खरेदी करताना त्यांनी शेतकरी असल्याचे कोणते दाखले सादर केले, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. तसेच थेराणी हे विंधणे गावात जमीन खरेदी करण्यापूर्वी कोणत्या ठिकाणचे शेतकरी होते, याचाही उलगडा होणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रकरणाची महसूल विभागाने सखोल चौकशी करून सत्यस्थिती स्पष्ट करावी, तसेच तहसीलदारांनी आपल्या अधिकारांचा वापर करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com