

माझ्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र द्या!
अटल सेतूवरील आत्महत्याप्रकरणी पत्नीची याचिका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : जवळपास दोन वर्षांपूर्वी अटल सेतूवरून आत्महत्या केलेल्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र मिळावे, म्हणून विधवा पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही याचिका न्यायालयाने स्वीकारली असून त्यावर लवकरच सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.
न्या. रवींद्र घुगे आणि न्या. हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने भारतीय पुरावा कायद्यान्वये संबंधित प्राधिकरणासमोर तोंडी आणि लेखी पुरावे सादर करण्याचे तसेच सीसीटीव्ही फुटेजची सत्यता सिद्ध करण्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याचे सुचवले. त्यावर हे फुटेज पुलावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे असून पोलिसांनी त्याची खातरजमा केली आहे. त्यामुळे याचिकाकर्तीला अंतरिम दिलासा मिळणे आवश्यक असल्याचे वकील अनिता कॅस्टेलिनो यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकेवर सुनावणी जुलै महिन्यात सूचिबद्ध केली.
---
नेमके प्रकरण काय?
डोंबिवलीस्थित के. श्रीनिवास कर्जबाजारी झाले होते. त्यांनी जुलै २०२४ मध्ये अटल सेतूवरून आत्महत्या केली होती. ही अटल सेतूवरील पहिलीच आत्महत्या होती. श्रीनिवासन यांच्या मृतदेहाचा बराच शोध घेऊनही तो हाती लागला नाही. सीसीटीव्ही फुटेजवरून पत्नीने संबंधित व्यक्ती पतीच असल्याची ओळख पटविली; मात्र कायद्यानुसार हरवलेल्या किंवा मृतदेह न सापडलेल्या व्यक्तीला मृत घोषित करण्यास सात वर्षांचा कालावधी आवश्यक असतो; मात्र श्रीनिवास यांच्या आत्महत्येस अवघे एक वर्ष नऊ महिने झाले आहेत; मात्र अपवादात्मक परिस्थितीचा आधार घेऊन पत्नीने न्यायालयात धाव घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.