

मोतीलाल ओसवाल साप्ताहिक सदर
मंगळवार २८ मार्चसाठी
टाटा स्टील : लक्ष्य - २४०
भारतात स्टीलची मागणी सतत वाढतच आहे. केंद्राच्या धोरणात्मक पाठिंब्यामुळे आणि उद्योग क्षेत्राची मोठी वाढ होत असल्यामुळे, या मागणीची अशीच चढती कमान राहील. टाटा स्टील आपली देशांतर्गत उत्पादन क्षमता, आपल्या कलिंगनगर आणि एनआयएनएल या प्रकल्पातून वाढवत आहे. तसेच त्यायोगे भविष्यातील वाढीच्या संधी साधण्याची क्षमताही बळकट करत आहे. स्टीलची देशी मागणी वाढत असून, स्टीलला मिळणारे ड्युटीचे संरक्षण, फ्लॅट स्टीलच्या किमतीत होणारी वाढ, आयातीचे कमी दडपण आणि चीनमध्ये स्टीलच्या उत्पादनावरील निर्बंध यामुळे देशांतर्गत मागणीतही वाढ होत आहे. युरोपात कार्बन बॉर्डर ॲडजेस्टमेंट मेकॅनिझमसारख्या नियमांमुळे आणि आयातीवर कठोर निर्बंध असल्याने किंमतवाढ होऊन जास्त उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. युरोपमधील त्यांची कामकाजाची कामगिरीही सुधारत असून, तोटा कमी होत आहे आणि इंग्लंडमधील व्यवसाय हा आता नफा दाखवण्याच्या पातळीवर आला आहे. एकंदरीत, मजबूत घरगुती मागणी, किंमतवाढीचा होत असलेला फायदा, सध्या सुरू असलेला विस्तार आणि युरोपीय कामकाजात होत असलेली सुधारणा याचा फायदा घेण्याच्या अवस्थेत कंपनी आहे.
रॅडीको खेतान : लक्ष्य - ३८५०
रॅडीको खेतान ही कंपनी भारतीय मद्य व्यवसायात आपली अवस्था मजबूत करत आहे. उच्च दर्जाच्या उत्पादनांमुळे मिळणारी चांगली किंमत आणि बाजारवाटा सतत वाढवणे यांचा फायदा त्यांना होत आहे. कंपनीने आपले रामपूर, जैसलमेर आणि रॉयल रणथंबोरसारखे उच्च दर्जाचे आणि श्रीमंती ब्रँडचे भांडार मोठ्या प्रमाणावर वाढवले असून, त्यातून त्यांना चांगले उत्पन्न आणि नफा मिळत आहे. उच्च दर्जाची व्हिस्की, व्होडका आणि स्कॉच या प्रकारात त्यांची मागणी जोरदार असून, देशाच्या सर्व भागांतील येणारी मागणी, लोकांचे वाढणारे उत्पन्न आणि या पेयांना मिळणारी सामाजिक मान्यता याचा फायदा कंपनीला होत आहे. कच्च्या मालाचे उत्पादन स्वतःच करण्याची रॅडीकोची व्यवस्था, चांगले वितरण जाळे, निर्मितीसाठी लागणारे सामान सहजतेने उपलब्ध होणे, यामुळे कच्चा माल पुरवठ्याच्या चढ-उतारांपासून त्यांना संरक्षण मिळते. सातत्यपूर्ण नवकल्पना, पाठबळ देणारी सरकारी धोरणे आणि कमी होणारे स्थिर खर्च यामुळे नफा क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवण्याच्या आणि दीर्घकालीन उत्पन्नवाढ करण्याच्या अवस्थेत कंपनी आहे.
सिएंट डीएलएम : लक्ष्य - ४७०
आधीच्या संरक्षणविषयक ऑर्डरचा जास्त खर्च आणि पश्चिम आशियातील भूराजकीय तणावांमुळे सिएंट डीएलएमचा या तिमाहीतील व्यवसाय संथ होत. कमी महसूल आणि स्थिर खर्च वाढले असले तरीही त्यांची नफा क्षमता अपेक्षेपेक्षा जास्तच राहिली. वेगवेगळ्या प्रकारांमधील उत्पादन वाढ तसेच संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातील उत्पादनांचा जास्त वाटा याचा फायदा त्यांना मिळाला. कंपनीचे ऑर्डर बुक मोठ्या प्रमाणावर वाढले असून, त्यातून चांगली कामे त्यांना मिळत आहेत, नवे ग्राहकही वाढत आहेत आणि अंतराळ, औद्योगिक आणि वाहन क्षेत्रातील चांगली कामे येत आहेत. त्यांची एकंदर कामगिरी चांगली होत असून वैविध्यपूर्ण बाजारपेठेमुळे मिळणारी चांगली नफाक्षमता, विक्रीतील मोठी वाढ, सरकारचा संरक्षण खर्च वाढत असल्यामुळे मिळणाऱ्या संधी, पुरवठा साखळीतील बदल आणि एआयवर आधारित वाढणारी मागणी यामुळे लवकरच कंपनीच्या व्यवसायाची मोठी वाढ होईल, अशी व्यवस्थापनाची अपेक्षा आहे.
ट्रेंट : लक्ष्य - ५२५०
ट्रेंटने सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी केली असून जास्त दुकानांचा समावेश केल्यामुळे त्यांना महसूलवाढ मिळाली आहे. तसेच ग्राहकांच्या वेगवेगळ्या कलानुसार उत्पादनांचा समावेश केल्याने त्याचा फायदाही त्यांना झाला आहे. वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने तसेच खर्चावर नियंत्रण, यामुळे त्यांची नफा क्षमताही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. झुडियो या दुकानाच्या ब्रँडचा मोठ्या प्रमाणावर विस्तार नव्या शहरांमध्ये करत असल्यामुळे त्यांना चांगलीच व्यवसायवाढ मिळत आहे. नवीन बाजारपेठांमध्ये ही वाढ हळूहळू होईल. दोन ते तीन वर्षांत तेथील व्यवसाय पूर्ण भरात येईल, अशी अपेक्षा आहे. कंपनीचे स्वतःचे ब्रँड आणि थेट ग्राहकांनाच वस्तू विकण्याचे मॉडेल यामुळे तीव्र स्पर्धेच्या युगात किमतीवर त्यांचे नियंत्रण राहते. तर मोठ्या वस्तीच्या ठिकाणी व्यवसाय वाढवल्याने त्यांची महसूल वाढही होते आहे. दुकानांची संख्यावाढ, पुरवठा साखळीचे आधुनिकीकरण आणि नवी उत्पादने विशेषतः, नव्या मागणीनुसारची सौंदर्यप्रसाधने, अंतर्वस्त्रे आणि पादत्राणे यांच्यातील विविधता लक्षात घेऊन, त्यावर भर देत भांडवलाचे वाटप केले जाते. सध्या वाढ संथ असली तरी कामे करण्याची चांगली स्थिती, स्थिर खर्च कमी करणे आणि एकंदरीत खर्चावर नियंत्रण यामुळे नफा वाढू शकेल. तर भविष्यातील नफा क्षमता वाढत असून मागणीत वाढ होत असताना एकंदर कंपनीची वाढही चांगली होणे अपेक्षित आहे.
डिक्सन टेक : लक्ष्य - १४,७००
कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे डिक्सन टेक्नॉलॉजीला नजीकच्या भविष्यकाळात किमतींवर दडपण येऊ शकते. या भाववाढीमुळे स्मार्टफोनने आपल्या किमती वाढवल्या असून, त्यामुळे डिक्सनची बाजारपेठ असलेल्या कमी आणि मध्यम विभागात विक्रीवर किंचित परिणाम होऊ शकतो; पण कंपनीचा दीर्घकालीन आढावा चांगला असून त्यास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. पी एन थ्री मंजुरीसंदर्भात सरकारने काही सवलती दिल्या असून, त्यामुळे डिक्सनचा विवोबरोबरचा प्रस्तावित संयुक्त प्रकल्प वेग घेण्याची अपेक्षा आहे. तसेच एचकेसीसह होणारे संयुक्त डिस्प्ले मॉड्यूल उपक्रम आणि ईसीएमएस स्कीम यामुळे डिक्सन्सचे कच्चा माल स्वतः निर्माण करण्याचे धोरण बळकट होईल. डिस्प्ले मॉड्यूल, कॅमेरा मॉड्यूल आणि अन्य महत्त्वाच्या भागांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढत असताना स्थानिक उत्पादनाचा मोठा फायदा कंपनीला होईल. यामुळे त्यांची नफा क्षमताही मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि त्यांची उत्पादन परियंत्रणा जास्त एकात्मिक होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.