

मुरबाड (वार्ताहर) : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती महोत्सवानिमित्त मुरबाड येथील कार्यक्रमात नगर पंचायतीचे माजी नगरसेवक रवींद्र देसले यांना आदर्श नगरसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुरबाड नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर पहिले नगरसेवक होण्याचा मान पटकावणारे देसले यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेतली आहे. या वेळी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भाजप नेते सुभाष पवार, भाजप ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष रामभाऊ दळवी, उल्हासनगर महापालिकेच्या माजी नगरसेविका अपेक्षा भालेराव, भाजपचे अध्यक्ष दीपक पवार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल घरत, आरपीआय (आठवले) पक्षाचे अध्यक्ष दिनेश उघडे, शहराध्यक्ष कैलास देसले, मुरबाड बौद्ध महासभेचे अध्यक्ष ॲड. शरद थोरात आणि कार्यक्रमाचे आयोजक आण्णा साळवे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी परिसर भीममय वातावरणात न्हाऊन निघाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.