

दीड किलोच्या लिंबाची चर्चा
औषधी गुणधर्मामुळे आकर्षणाचे केंद्र
विरार, ता. २७ (बातमीदार)ः शहरातील फरमीन परेरा यांच्या वाडीतील इडलिंबूला एक किलो ६५० ग्रॕम वजनाचे फळ लागले आहे. अनेक विकारांवर औषधी फळ असल्याने या लिंबाची चर्चा रंगली आहे.
विरारच्या पश्चिमेतील उंबरगोठण येथील शेतकरी फरमीन परेरा यांनी दुबई येथे अरेबीयन आॅटोमोबाईल कंपनीत १५ वर्षे उच्चपदावर नोकरी केली. चांगल्या पगाराची नोकरी सोडून मायदेशी आल्यावर त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने शेतीतून विविध प्रयोग केले आहे. सध्या तीन एकर जागेत हजारी, बनकेळी, लाल केळी, सफेद वेलची, आंबट वेलची, भुर केळी, बिनबोंड अशा विविध जातीच्या केळींची शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड केली आहे. तीन वर्षांपूर्वी लावलेल्या इडलिंबूच्या झाडाला वर्षभरापासून फळधारणा होत आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या आकाराचे फळ आता पहिल्यांदाच आले आहे.
---------------
बघ्यांची गर्दी
दोन महिन्यांपासून इडलिंबाचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य प्रकारे त्याची निगा राखल्यानंतर त्याचे वजन तब्बल एक किलो ६५० ग्रॅम भरले आहे. वातावरणातील बदलामुळे हा प्रकार घडला असल्याचे फरमीन यांनी सांगितले. हा लिंबू पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.