वसई विरार शहरात वृक्ष प्रदर्शन

वसई विरार शहरात वृक्ष प्रदर्शन
Published on

पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
वृक्ष प्रदर्शनी भरवण्याचा पालिकेचा निर्णय
वसई, ता. २७ (बातमीदार)ः शहरात काँक्रीटीकरण वाढले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षगणना, संवर्धन, प्रदर्शनातून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प पालिकेने केला आहे.
शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. रहिवासी संकुलासह, औद्योगिक वसाहतीचा समावेश आहे. वाढत्या वाहनांची संख्या, धूलिकणांचा प्रभाव, कचऱ्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने महापालिका, विविध सामाजिक संस्था वृक्षलागवड मोहीम राबवत आहेत. विविध प्रजातीची रोपांची गणना, हरित क्षेत्र टिकवण्यासाठी पालिका नियोजन करत आहे. यात महत्त्वाचे म्हणजे वृक्ष प्रदर्शन ठरणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत माहिती दिली जाणार असून, वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. तसेच नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे याकरिता हरित क्षेत्र विस्तारीकरणावर प्रशासन भर देणार आहे.
--------------------------
वृक्ष संवर्धनावर भर
वसई-विरार शहरात वृक्ष प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. याअंतर्गत पर्यावरणविषयक जागरूकता वाढवण्यासाठी वृक्ष प्रदर्शन, माहिती फलक, हरित उपक्रम होणार आहेत. या उपक्रमामुळे वृक्ष संवर्धन अधिक प्रभावी होऊन शहराच्या पर्यावरणीय नियोजनाला गती मिळणार आहे. मात्र, महापालिका हा उपक्रम कधी राबवणार, याबाबत पर्यावरणप्रेमींची उत्सुकता वाढली आहे.
-----------
चार कोटी ५० लाखांची तरतूद
वसई शहरात हरित क्षेत्र किती आहे, हे जाणून घेण्यासाठी गणना करण्यात येणार आहे. शहरातील वृक्षांची संख्या, प्रजाती, उंची, आरोग्य स्थिती यांची नोंदणी करण्यात येईल. त्यानुसार पुढील कार्यवाही करून हरित क्षेत्राच्या संवर्धनासाठी अंदाजपत्रकात चार कोटी ५० लाखांची तरतूद प्रस्तावित केली आहे.
-------------
वसई-विरार शहरात वृक्षलागवड, संवर्धनासोबत प्रदर्शन अशी संकल्पना पालिकेकडून राबविण्यात येणार आहे. जेणेकरून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण होईल.
- अजीव पाटील, महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com