‘अपात्र’ ठरवण्याच्या निर्णयाविरोधात धारावीकर रस्त्यावर

‘अपात्र’ ठरवण्याच्या निर्णयाविरोधात धारावीकर रस्त्यावर
Published on

‘अपात्र’ ठरवण्याच्या निर्णयाविरोधात धारावीकर रस्त्यावर
धारावी पुनर्विकासाविरोधात ४ मे रोजी जनआक्रोश मोर्चा
धारावी, ता. २७ (बातमीदार) : धारावीतील पुनर्विकास प्रक्रियेत ८५ टक्के रहिवाशांना अपात्र किंवा अनिर्णित ठरवण्याच्या निर्णयाविरोधात सोमवारी (ता. ४ मे) जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात धारावी बचाव आंदोलनाची बैठक रविवारी (ता. २६) सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते उलेश गजकोश यांच्या अध्यक्षतेखाली धारावीतील राजे शिवाजी विद्यालयात पार पडली.
मोर्चा ४ मे रोजी सकाळी ११ वाजता कुंभारवाडा नाका येथून सुरू होऊन माटुंगा येथील किंग्स सर्कलमधील एनएमडीपीएल कंपनीच्या कार्यालयापर्यंत जाणार आहे. या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, आमदार महेश सावंत, आमदार ज्योती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ डीआरपी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करणार आहे.
बैठकीस सीपीआयचे नसीरुल हक व शंकर कुंचिकोरवे, काँग्रेसचे प्रवक्ते शकील चौधरी, आपचे पॉल राफेल, अयुब शेख, समाजवादी पार्टीचे राहुल गायकवाड, अशफाक खान, बीएसपीचे श्यामलाल जैस्वार, मनसेचे आरिफ शेख, बिझनेस असोसिएशनचे समीर मगरू शेख व अन्सार शेख, एनसीपी-एसपीचे नसीर खान उर्फ गोरे भाई, तसेच सीपीआयचे (एम) एम. एस. सेल्वन यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये धारावीतील सर्व रहिवाशांना पात्र घोषित करणे, ‘पात्र-अपात्र-अनिश्चित’ हा गोंधळ थांबवणे, प्रत्येक रहिवाशाला किमान ५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे घर देणे, तसेच दुकाने, कारखाने, गोदामे आणि व्यवसायांना धारावीतच पर्यायी जागा देणे यांचा समावेश आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, धार्मिक स्थळे आणि मोकळी मैदाने यांनाही पुनर्विकासात स्थान देण्याची मागणी करण्यात येणार आहे.

काय आहेत मागण्या?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com