छ.शिवाजी नगर येथील पाणी प्रश्न मिटणार,

छ.शिवाजी नगर येथील पाणी प्रश्न मिटणार,
Published on

छत्रपती शिवाजीनगर येथील पाणीप्रश्न मिटणार
रोहा, ता. २७ (बातमीदार) ः रोहे शहरातील छत्रपती शिवाजीनगर या विभागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. कमी दाबाने पाणी येत असल्याने स्थानिकांमध्ये संतापचे वातावरण होते. मुबलक पाणी मिळावे व पाणी समस्या कायमस्वरूपी दूर व्हावी या अनुषंगाने नागरिकांनी नगरसेवकांकडे समस्या मांडली. नगरसेवक अजीत मोरे व नगरसेविका पूर्वा मोहिते यांनी नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी व पाणीपुरवठा सभापती महेंद्र दिवेकर यांची भेट घेऊन हा विषय तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर या भागाला बायपास लाइन टाकाण्याचा ठराव पारित केला असून, भूमिपूजन केले आहे. यामुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com