

कोंबड्यांच्या पिंजऱ्यात अडकलेल्या अजगराची सुटका
खालापूर, ता. २७ (बातमीदार) ः भक्ष्याच्या शोधात कोंबड्यांच्या पिंजऱ्यात शिरलेला सुमारे सहा फूट लांबीचा अजगर अडकून बसल्याची घटना खोपोली हद्दीतील हाळ बुद्रुक गावात घडली. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे अजगराची सुरक्षित सुटका करण्यात आली. अमजद सोंडे यांना गुरुवारी (ता. २३) कोंबड्यांचा विचित्र ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी कोंबड्याच्या पिंजऱ्याकडे जाऊन पाहिले असता अजगर पिंजऱ्यात अडकून बसल्याचे निदर्शनास आले. सोंडे यांनी तत्काळ हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर आणि अमोल ठकेकर यांना याबाबत माहिती दिली. सर्पमित्रांनी अजगराला सुखरुप बाहेर काढत नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.