अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर एक दिवशीय प्रशिक्षण

अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर एक दिवशीय प्रशिक्षण
Published on

‘अंधश्रद्धा निर्मूलन’वर एकदिवसीय प्रशिक्षण
खारघर (बातमीदार) ः विवेक जागर संस्थेअंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने खारघरमधील डॉ. जी. के. डोंगरगावकर विधी महाविद्यालयात शनिवारी (ता. २५) एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर पार पडले. या शिबिरात फलज्योतिष चिकित्सा, महाअंनिस कार्यपद्धती, महाअंनिस पंचसूत्री आणि चमत्कार सादरीकरण, माइंड रिडिंग व वैज्ञानिक दृष्टिकोन आदी विषयावर पुणे येथील प्रा. विवेक काशीकर, प्रा. प्रदीप कासुर्डे, अशोक निकम आदी वक्त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सहभागी झालेल्या प्रशिक्षणकर्त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा जोम कायम ठेवण्याचा संकल्प केला. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी प्रिया कदम, जितेंद्र बनसोडे आणि इतर सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com