विद्याभवनच्या दहा विद्यार्थ्यांची एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी निवड

विद्याभवनच्या दहा विद्यार्थ्यांची एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी निवड
Published on

विद्या भवनच्या १० विद्यार्थ्यांची एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी निवड
नेरूळ (बातमीदार) ः पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्या भवन शिक्षण संकुलाच्या माध्यमिक मराठी विभागातील १० विद्यार्थ्यांनी नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून ठाणे जिल्ह्यातून गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षा इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देता येते. डिसेंबरमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या एनएमएमएस परीक्षेच्या निकालामध्ये १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी १० विद्यार्थ्यांनी गुणवत्ता निवड यादीत स्थान मिळवले. या शिष्यवृत्ती प्राप्त प्रत्येक विद्यार्थ्याला शासनातर्फे इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरवर्षी १२ हजार रुपयांप्रमाणे एकूण रुपये ४८ हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे.
पुणे विद्यार्थी गृह कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, कुलसचिव दिनेश मिसाळ, माजी कार्याध्यक्ष प्रा. कृ. ना. शिरकांडे, सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक गोरख कदम, श्रीजा नायर, मनीषा मुळीक, सुवर्णा मिसाळ, पर्यवेक्षिका शोभा लवटे, अस्मिता सलगर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com