नालेसफाईत दिरंगाई चालणार नाही

नालेसफाईत दिरंगाई चालणार नाही
Published on

नालेसफाईवरून झाडाझडती
उपमहापौर मार्शल लोपीस यांचा इशारा
वसई, ता. २७ (बातमीदार)ः शहरात मॉन्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. विरार येथील कामांचा उपमहापौर मार्शल लोपीस यांनी आढावा घेतला होता. या वेळी कामात कोणतीही दिरंगाई चालणार नसल्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
वसई-विरार शहरात पावसाळ्यात अनेक इमारती, खोलगट भाग पाण्याखाली जातात. विविध मार्गावर जलमय स्थिती निर्माण होऊन वाहतूक ठप्प होते, पण यंदा तशी परिस्थिती टाळण्यासाठी आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी नालेसफाईच्या कामांना गती दिली आहे. बहुजन विकास आघाडीचे उपमहापौर मार्शल लोपीस यांनीदेखील नालेसफाईच्या कामांची पाहणी करून अधिकारी, ठेकेदारांना सूचना दिल्या आहेत. तसेच पावसाळ्यात पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यासाठी कोणतीही ढिलाई चालणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. या वेळी महापालिका अधिकारी, माजी सभापती सखाराम महाडिक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com