

मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
पालघर, ता. २७ (बातमीदार) : जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून मधमाशी पालन उद्योगातील अनुभव व कौशल्य, मधोत्पादन, संशोधन मदत व विकास यामध्ये कामकाज केलेल्या यशस्वी मध उद्योजकांना मधुमित्र व मधुसखी पुरस्कार देण्यात येतो. अशा उद्योजकांना पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने २०२६ साठी मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात आले आहे.
मंडळाच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून ही पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. मधमाशीपालन व्यवसायास गती मिळावी व मधपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने हा उपक्रम सुरू केला आहे. मधमाशीपालनात अनेक वर्षे काम करणाऱ्या यशस्वी मधपाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने या पुरस्कार योजनेत सन्मानित करण्यात येणार आहे. यातील एक पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव असेल. पुरस्काराची रक्कम प्रथम अकरा हजार रुपये, द्वितीय सात हजार रुपये आणि तृतीय पाच हजार रुपये अशी आहे.
----------------
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा
२० मे रोजी जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून जिल्हा पुणे येथे जाहीर समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील. या पुरस्काराची लिंक मंडळाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात खादी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात नामांकन अर्ज मिळू शकतील, असे मंडळाचे नित्यानंद पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.