

विठ्ठलवाडी-उल्हासनगरदरम्यान धावत्या लोकलमध्ये चाकूहल्ला
मोबाईल लुटण्याचा प्रयत्न, सराईत आरोपी अटकेत
उल्हासनगर, ता. २७ (वार्ताहर) : विठ्ठलवाडी ते उल्हासनगरदरम्यान धावत्या लोकलमध्ये चाकूचा धाक दाखवत मोबाईल लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली. या वेळी डब्यातील प्रवाशांनी दाखवलेल्या धाडसामुळे आरोपीला पकडण्यात यश आले. या झटापटीत एक प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे.
नितेशकुमार शहा हे दुपारच्या सुमारास खोपोलीकडे जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करीत असताना आरोपी जोगिंदर सिंग लबाना याने त्यांच्या खिशातील मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. शहा यांनी त्याला रंगेहाथ पकडताच आरोपीने सुटण्यासाठी झटापट सुरू केली आणि शिवीगाळ केली. पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने धारदार चाकू काढत शहा यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत शहा किरकोळ जखमी झाले. दरम्यान, इतर प्रवाशांनी तत्परता दाखवत आरोपीला पकडून ठेवले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच्या आधारे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला. जखमी नितेशकुमार शहा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेत उल्हासनगर येथील त्याच्या राहत्या घरातून जोगिंदर सिंग लबाना याला अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली.
पोलिस तपासात लबाना हा सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले असून, त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.