उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांना सांगीतिक आदरांजली

उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांना  सांगीतिक आदरांजली
Published on

उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांना सांगीतिक आदरांजली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २७ : उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांच्या स्मृतींना समर्पित एक अविस्मरणीय सांगीतिक मैफल नुकतीच मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये रंगली. ‘ग्रेस फाउंडेशन’ आणि ‘यादगार सभा’ यांच्या पुढाकाराने आयोजित या मैफलीला रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पतियाळा घराण्याचे अध्वर्यू असलेल्या उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांनी खयाल, ठुमरी, दादरा यांसारख्या प्रकारांतून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला अधिक भावप्रधान केले. याच वारशाला मानवंदना देण्यासाठी ही मैफल आयोजित करण्यात आली होती. या मैफलीची सुरुवात गायिका श्रुती बुजरबरुआ यांनी ‘राग श्री’ने केली. ‘कहा मै गुरू ढूंढन जाऊं’ हा बडा खयाल त्यांनी शांत लयीत सादर केला. त्यानंतर ‘राग पिलू’मधील दादऱ्याने त्यांनी शृंगाररस खुलवला.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रमाकांत गायकवाड यांनी त्यांच्या गायनाने मैफलीला एका वेगळ्या उंचीवर नेले. ‘राग रागेश्री’ आणि ‘राग सोहनी’तील रचना सादर करीत त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ‘का करू सजनी आये ना बालम’ सादर करताना त्यांनी सभागृहात एक गूढ शांतता निर्माण केली. मैफलीची सांगता ‘राग मिश्र पहाडी’मधील ‘हरी ओम तत्सत’ या भक्तिरसपूर्ण भजनाने झाली. तबल्यावर यशवंत वैष्णव, सारंगीवर फारुख लतीफ खान आणि हार्मोनियमवर सिद्धार्थ मेस्ता यांनी अत्यंत समर्पक साथ दिली. शशी व्यास यांच्या निवेदनाने आणि राजीव सेठी यांच्या आठवणींनी कार्यक्रमाला अधिक भावपूर्णस्वरूप मिळाले. ही मैफल खऱ्या अर्थाने एक संस्मरणीय अनुभव ठरल्याची भावना उपस्थित रसिकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com