ट्रान्सफॉर्मर स्थलांतराचा मार्ग मोकळा

ट्रान्सफॉर्मर स्थलांतराचा मार्ग मोकळा
Published on

बदलापूर, ता. २६ (बातमीदार) : शहरातील हेंद्रेपाडा, बॅरेज रोड, चर्च परिसर; तसेच उल्हास नदीलगतच्या भागात वारंवार निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ट्रान्स्फॉर्मर स्थलांतराची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांनी पुढाकार घेत या कामासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
महावितरणचे अधिकारी वाघमोडे यांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. रस्त्याच्या कडेला व रहदारीच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या ट्रान्स्फॉर्मर्सची स्थिती पाहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सुरळीत वाहतुकीसाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. ज्या ठिकाणी स्थलांतर अत्यावश्यक त्या ठिकाणांची नोंद करून लवकरात लवकर ट्रान्स्फॉर्मर हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. या पाहणीवेळी शिवसेनेचे नगरसेवक तुषार बेंबळकर आणि संदेश ढमढेरे यांनीही उपस्थित राहून सहकार्य केले. वाहतुकीच्या दृष्टीने दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देत सर्व संबंधितांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. सध्या ट्रान्स्फॉर्मरमुळे अरुंद झालेल्या रस्त्यांवरून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र, प्रस्तावित स्थलांतरामुळे हा अडथळा कायमस्वरूपी दूर होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महावितरणकडूनही या कामासाठी सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती राजेंद्र घोरपडे यांनी दिली. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com