सकाळ इम्पॅक्ट : सीएसएमटीच्या खांबांवरील ते ‘गूढ’ विद्रुपीकरण अखेर पुसले!

सकाळ इम्पॅक्ट : सीएसएमटीच्या खांबांवरील ते ‘गूढ’ विद्रुपीकरण अखेर पुसले!
Published on

‘सकाळ इम्पॅक्ट’
---
सीएसएमटीवरील ‘ते’ विद्रूपीकरण हटविले
रेल्वे प्रशासनाची धावपळ; सीसीटीव्हीद्वारे शोध सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील खांबांवर चित्रविचित्र आकृत्या, संख्यात्मक नोंदी तसेच विशिष्ट शब्द रेखाटण्यात आल्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत मध्य रेल्वेने तातडीने संबंधित खांबांवरील विद्रूपीकरण रंग लावून हटवण्यात आले. दरम्यान, हे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून वेगाने तपास सुरू केला आहे.
सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १ वरील खांब क्रमांक १५ आणि १६ वर स्केच पेनने विचित्र आकृत्या, ‘पॅरानॉर्मल’सारखे शब्द आणि २०१० ते २०२५ या कालावधीचा उल्लेख असलेल्या नोंदींमुळे प्रवाशांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. यासंदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करताच रेल्वेच्या सुरक्षा विभागाने सर्व संशयास्पद आकृत्या आणि मजकूर रंग लावून हटविण्यात आले. हे कृत्य कोणी एकाने किंवा गटाने केले, याबाबत सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
----
कठोर कारवाईचा इशारा
ही वास्तू आपला ऐतिहासिक वारसा असून तिचे सौंदर्य जपणे ही आपली जबाबदारी आहे. खांबांवरील लिखाण काढण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयास्पद हालचाली आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. प्रवाशांनीही अशा प्रकारच्या विद्रूपीकरणाची माहिती त्वरित स्टेशन मास्तरांना द्यावी, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com