सरनाईक–मेहता वाद पेटला

सरनाईक–मेहता वाद पेटला
Published on

सरनाईक-मेहता वाद पेटला
कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रारीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : महायुतीत असतानाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक विरुद्ध भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. हा वाद इतका विकोपाला गेला आहे की घोडबंदर परिसरातील जमीन बळकावल्याचा आरोप करीत मेहता यांनी कासारवडवली पोलिस ठाण्यात सरनाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

भाजपा आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेना शिंदे गटाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वाद जुना असला तरी तो आतापर्यंत मिरा-भाईंदर पुरता मर्यादित होता. मात्र मेहता यांनी आता थेट ठाण्यात येऊन मंत्री सरनाईक यांना आव्हान देण्याचा प्रयत्न सोमवारी केला. याला निमित्त ठरले भाईंदरपाडा येथील जमीन व्यवहाराचे. भाईंदरपाडा येथील सुमारे २,४३९ चौ. मीटर जमिनीपैकी १,२१९ चौ. मीटर जमीन सरनाईक आणि त्यांच्या समर्थकांकडून बळकावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी संबंधित भूमिपुत्रांवर अन्याय झाल्याचा दावा करीत त्यांनी मिरा-भाईंदर येथील कार्यकर्त्यांसह कासारवडवली पोलिस ठाणे गाठले. या वेळी त्यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाईची मागणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे दौऱ्यावर असतानाच हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
-----
हा स्वाभिमानाचा मुद्दा
मंत्री प्रताप सरनाईक हे आपल्या गुंडांकडून येथील भूमिपुत्रांना धमकवण्याचे काम करीत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. हा केवळ जमिनीचा प्रश्न नसून, हक्क आणि स्वाभिमानाचा मुद्दा असल्याचेही भाजप आमदार नरेंद्र मेहता म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com