

रस्त्यावर झुकलेल्या फांद्यांमुळे अपघाताची भीती
छाटणी करण्याची नागरिकांची मागणी
नेरूळ, ता. २८ (बातमीदार) ः नेरूळ सेक्टर सहा ते कुकशेत गावादरम्यान असलेल्या रस्त्यावर झाडांच्या वाढलेल्या फांद्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, पावसात फांद्या पडून एखादा अपघात होण्याची भीती नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर झाडांच्या फांद्यांची तातडीने छाटणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कुकशेत गावाच्या कोपऱ्यावरील बहुउद्देशीय मार्केट ते रिजेन्सी टॉवर-ॲन्कापोलिस टॉवर या मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडे असून त्यांच्या फांद्या रस्त्यावर झुकल्या आहेत. या फांद्यांमुळे रस्त्यावर पुरेशा प्रमाणात प्रकाश पडत नाही. पावसाळा सुरू होण्यास एकच महिन्याचा अवधी बाकी असून या काळात झाडांच्या सैल फांद्या तुटून पडण्याचा धोका आहे. त्यामुळे वाहनांचे आणि पादचाऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहनांचे नुकसान झाल्यास विमा भरपाई मिळू शकते; मात्र पादचाऱ्यांना इजा झाल्यास भरपाई मिळणे कठीण असल्याची चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांची तातडीने छाटणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे संभाव्य जीवित व वित्तहानी टाळता येईल, तसेच रस्त्यावर प्रकाश व्यवस्था सुधारेल, असे नागरिकांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.