हर्बर रेल्वे मार्गावर मेट्रोचा महाकाय गर्डर बसवला

हर्बर रेल्वे मार्गावर मेट्रोचा महाकाय गर्डर बसवला
Published on

हार्बर मार्गावर
महाकाय गर्डर
मेट्रो-२बीचे काम वेगात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : अंधेरी डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो-२ बी मार्गिकेवर कुर्ला ते टिळकनगरदरम्यान हार्बर रेल्वे मार्गावर एमएमआरडीएने महाकाय लोखंडी गर्डर बसवला. हार्बर रेल्वे मार्गिकेच्या नियमित संचलनात कोणताही व्यत्यय न आणता तब्बल ४१.५ मीटर लांबी आणि १७८ टन वजनाचा गर्डर (स्टील कॉम्पोझिट स्पॅन) बसवला आहे.
मुंबई उपनगरात पूर्व-पश्चिम जोडणीच्या दृष्टीने मेट्रो-२ बी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या मार्गिकेवरील काम वेगाने सुरू आहे. सारस्वत नगर ते चेंबूर हा टप्पा या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचा महत्त्वाचा भाग असून, रेल्वे ट्रॅकवरून गर्डर बसवणे गुंतागुंतीचे आणि मोठे आव्हानात्मक काम होते; मात्र एमएमआरडीएने ही कामगिरी अचूक नियोजन आणि सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेत पार पाडली आहे. हा गर्डर हैदराबाद येथील विशेष सुविधा केंद्रात तयार केला होता. त्यासाठी ५०० टन क्षमतेच्या दोन क्रेनचा वापर करण्यात आला, तर तिसरी क्रेन राखीव ठेवली होती.
---
स्टील स्पॅनची वैशिष्ट्ये
- लांबी : ४१.५ मीटर
- रुंदी : ११ मीटर
- वजन : १७८ मेट्रिक टन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com