

सीएसएमटीवरील कामांमुळे
गाड्या दादर, ठाण्यात थांबणार!
मुंबई, ता. २७ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १६ आणि १७च्या विस्तारीकरणामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्या दादर आणि ठाणे येथेच थांबविण्यात येणार आहेत. हा बदल पुढील २३ दिवसांसाठी म्हणजेच २७ एप्रिल ते १९ मे २०२६ पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
या कालावधीत ट्रेन क्रमांक २२१२० मडगाव-मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस ही गाडी २६ एप्रिल ते १७ मेदरम्यान दादर स्थानकापर्यंत धावेल, तर ट्रेन क्रमांक १२१३४ मंगळुरू- सीएसएमटी एक्स्प्रेस ही गाडी २६ एप्रिल ते १८ मेदरम्यान ठाणे स्थानकातच थांबवण्यात येणार आहे. परिणामी, या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढील प्रवासासाठी दादर किंवा ठाणे येथून पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. दरम्यान, सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम वेगाने सुरू असून, प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सुविधा वाढविण्याचा हा प्रयत्न असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.