म्हाडाच्या घरांसाठी केवळ ४५,८१० अर्ज

म्हाडाच्या घरांसाठी
केवळ ४५,८१० अर्ज
Published on

म्हाडाच्या घरांसाठी केवळ ४५,८१० अर्ज

मुदतवाढीसाठी हालचाली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने २,६४० घरांसाठी २९ दिवसांत केवळ ४५ हजार ८१० अर्ज आले असून, २९ हजार ६१० जणांनीच अनामत रक्कम भरून आपला अर्ज अंतिम केला आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्याच्या हालचाली मुंबई मंडळाने सुरू केल्या आहेत.

म्हाडाच्या मुंबई मंडळाने २०२४मध्ये २,०२० घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या जाहिरातीसाठी तब्बल एक लाख १३ हजार अर्ज आले होते. २०२५मध्ये मुंबईतील घरांची लाॅटरी न आल्याने म्हाडाने नुकत्याच काढलेल्या लाॅटरीला मोठा प्रतिसाद मिळेल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता; मात्र बहुतांश घरांच्या किमती कोटीच्या घरात आहेत. अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती दीड ते दोन कोटी रुपये असल्याने मुंबईकरांनी यंदाच्या लाॅटरीला अल्प प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. २९ एप्रिलला अर्ज भरण्याची मुदत संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर लाॅटरीकरिता अर्ज करण्याची मुदत आणखी १५ दिवसांनी वाढवण्याची तयारी म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुरू केली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com