

विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या मालमत्तेवर सासरच्यांचा अधिकार
उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : ‘विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीवर तिच्या माहेरच्यांचा नव्हे, सासरच्यांचा हक्क असतो,’ असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदविले तसेच मृत महिलेच्या संपत्तीवर दावा करणारी भावाची याचिका फेटाळून लावली.
हिंदू वारसा कायद्यानुसार, विवाहितेच्या संपत्तीवर पतीच्या नातेवाइकांनाच हक्क सांगता येत असल्याचे न्या. फिरदोश पूनीवाला यांच्या एकलपीठाने नमूद केले. बिमल सिक्का (८१) यांच्या मृत्यूनंतर भावाने त्यांच्या संपत्तीवर हक्क सांगून उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु एकलपीठाने त्याचा दावा फेटाळला. न्यायालयाने बिमल यांच्या नणंदेचा संपत्तीवरील अधिकार मान्य केला. हिंदू वारसा हक्क कायद्याच्या कलम १५ नुसार, महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीवर पतीच्या वारसांना प्राधान्य दिले जाते. या प्रकरणात मृत महिलेच्या पतीची बहीण हयात असल्याने तिला कायद्यानुसार हा वारसा हक्क मिळतो. त्यामुळे याचिकाकर्ता नंतर येत असल्याने अशा स्थितीत तो बहिणीच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. बिमल यांनी इच्छापत्राद्वारे नणंदेच्या नावावर संपत्ती केली होती. त्याबाबतचे बक्षीस खतही तयार केले होते. तथापि, बिमलचा एकमेव जवळचा नातेवाईक असल्याचा दावा करून याचिकाकर्त्याने बहिणीचे इच्छापत्र व बक्षीस खत रद्द करण्याची मागणी केली होती.
दुसरीकडे आपण बिमल यांच्या पतीची नातेवाईक आहोत आणि बिमल यांनी इच्छापत्राद्वारे त्यांची संपत्ती आपल्या नावे करताना नेपियन्सी रोडवरील सदनिकाही बिमल यांनी बक्षीस खताद्वारे आपल्या नावावर केल्याचा दावा बिमल यांच्या नणंदेने केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.