आनंदनगरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर

आनंदनगरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर
Published on

उरण, ता. २७ (बातमीदार) : आनंदनगर विभागात गेल्या दहा दिवसांपासून पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. येथील नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी पाहणी केली असता, व्यावसायिकांच्या हलगर्जीपणामुळे ठिकठिकाणी जलवाहिनी फुटल्याचे निदर्शनास आले. ती त्वरित दुरुस्त करण्याचे खडेबोल सुनावले. त्यानंतर प्रशासनाने ती दुरुस्त करण्यास सुरवात केल्याचे नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी सांगितले.

उरण शहराला एमआयडीसीच्या रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. रानसई धरणातून जूनापर्यंत पाणीपुरवठा नागरिकांना सुरळीत व्हावा, यासाठी एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून दोन दिवस पाणीकपात केली जाते. त्यातच अनेक वर्षापासून जलवाहिनीचे काम केले नसल्याने शहरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात नगरपरिषद हद्दीत पाणी समस्येचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. मात्र अशातच गेल्या दहा दिवसांपासून आनंदनगर परिसरामध्ये पाणीपुरवठा बंद असल्याचे तक्रारी नागरिकांकडून नगरपालिका करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com